Menu Close

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आवारातील मंदिर पालिकेकडून उद्ध्वस्त !

कल्याण, ६ नोव्हेंबर – अनेक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात असलेले मंदिर तोडण्याची कारवाई महापालिकेच्या क प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात ५ नोव्हेंबरला सायंकाळी करण्यात आली. हे मंदिर तोडण्यास वाल्मीकी समाजाने कडाडून विरोध केला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील अनधिकृत मंदिरावर कारवाई करण्यात येत होती. त्यातील अनधिकृत मंदिरांच्या यादीतील हे मंदिर होते. त्यावर आज कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकार्‍यांनी दिली. कारवाईपूर्वी मंदिरातील गोरक्षनाथ आणि गोगा देवाची मूर्ती भक्तांनी बाहेर काढल्यानंतर मंदिर भुईसपाट करण्यात आले.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *