लक्ष्मणपुरी – पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा प्रचार करणारे, असहिष्णुतेवर बोलणारे आणि हिंदु आतंकवादाचे सूत्र मांडणारे परदेशी शक्तींच्या सांगण्यावर काम करत आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. अभिनेते कलम हसन यांनी ‘देशात हिंदु आतंकवाद आहे’, असे म्हटले होते, त्यावर योगी आदित्यनाथ बोलत होते.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले,
१. हिंदूंना आतंकवादी म्हणणारे देशद्रोही आहेत. त्यांना देश कधी क्षमा करणार नाही.
२. सनातन धर्म भारताचा एकमात्र धर्म आहे, तर अन्य सर्व धर्म सनातन धर्माच्या विविध सिद्धातांचे आणि संस्कृतींचे पालन करतात.
३. देशात धर्मनिरपेक्षता नावाची कोणतीही गोष्ट नाही. असे काही आहे, असे सांगणे हा स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठा खोटारडेपणा आहे.
४. सर्व लोकांना त्यांच्या धर्मावर श्रद्धा ठेवण्याचा अधिकार आहे; मात्र त्याही पेक्षा देश मोठा आहे. अशा वेळी कोणीही असहिष्णुतेच्या नावावर देशाच्या विरोधात आणि हिंदु आतंकवादावर बोलू शकत नाही.
५. हिंदु धर्म ही संस्कृती आहे आणि जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंदूंनी त्यांच्या देशात मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू आदी धर्मांच्या लोकांना आश्रय दिला आहे.
६. भारताने जगाला सहनशक्ती दिली आहे. हिंदु धर्म अन्य धर्मांचा सन्मान करतो; परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यांनी हिंदूंना आतंकवादी म्हणावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात