मुंबई – जोपर्यंत वाद संपत नाही, तोपर्यंत चित्रपटाचे हक्क खरेदी करणार नाही, अशी भूमिका पद्मावती चित्रपटाच्या राजस्थानमधील वितरकाने घेतली आहे.
राजस्थानमधील राज बंसल या वितरकाने एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, राजपूत समुदायाबरोबरच वितरकही मानतात की, पद्मावती चित्रपटामध्ये ऐतिहासिक संदर्भ चुकीचे दाखवले आहेत. या वादाचे जोपर्यंत सौहार्दपूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत राजस्थानमध्ये चित्रपटाचे हक्क खरेदी केले जाणार नाहीत. राजस्थानमध्ये ३०० पेक्षा अधिक स्क्रिन्स (चित्रपटगृहे) आहेत. त्यामुळे जर हा विरोध असाच कायम राहिला, तर चित्रपट निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
जयपूरच्या राजकुमारींचाही विरोध
भाजपच्या आमदार आणि जयपूरच्या पूर्वाश्रमीच्या राजकुमारी दिया कुमारी यांनीही या चित्रपटाला विरोध केला आहे. त्यांनी ट्वीट करून ‘राजस्थानच्या राजपुतांच्या इतिहासाचे विकृतीकरण मान्य होणार नाही’, असे म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात