Menu Close

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैय्या कुमारच्या विरोधात कोल्हापूरमध्ये हिंदुत्वनिष्ठांची जोरदार निदर्शने

पोलिसांनी २० हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतले !

  • आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना तात्काळ कह्यात घेणारे पोलीस कधी अवैध कृत्ये करणार्‍या आणि दंगली माजवणार्‍या धर्मांधांवर अशी कारवाई करतात का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

  • कन्हैय्या कुमार याच्या कार्यक्रमाला मोठा विरोध असतांनाही पोलिसांनी कार्यक्रमाला अनुमती दिल्याच्या कारणावरून हिंदुत्वनिष्ठांनी वारंवार पोलीस अधिकार्‍यांसमोर तीव्र असंतोष व्यक्त केला.

कनैय्या कुमारच्या विरोधात आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष, अखिल भारतीय छात्र परिषदेचा वादग्रस्त नेता तथा देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैय्या कुमार याची येथे सभा होण्यापूर्वी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते संघटित झाले होते. कन्हैय्या कुमार सभेच्या स्थळी आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी कन्हैय्या कुमारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आणि घोषणा दिल्या. या वेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यक्रमस्थळी जातांना पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना अडवले. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी २० हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेऊन त्यांना पोलीस मुख्यालयातील अलंकार कार्यालयात ठेवले आणि दुपारी २ नंतर सर्वांना सोडून दिले. हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे कन्हैय्या कुमारची सभा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

कन्हैय्या कुमारच्या सभेच्या विरोधात बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, शिवसेनेचे श्री. रणजीत आयरेकर यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

हिंदुत्वनिष्ठांच्या जोरदार घोषणांनी नाट्यगृहाचे सभागृह दणाणले !

केशवराव भोसले नाट्यगृहात हिंदुत्वनिष्ठांनी ‘कन्हैय्या कुमार मुर्दाबाद !’, ‘सैनिकांविषयी चुकीचे आक्षेप घेणार्‍या कन्हैय्या कुमार यांचा निषेध !’, ‘आतंकवादी महंमद अफझलची बाजू घेणार्‍या कन्हैय्या कुमार याला अटक करा !’, ‘जय भवानी जय शिवाजी !’, ‘वन्दे मातरम्’, अशा जोरदार घोषणा दिल्या. कार्यक्रम संपल्यानंतरही हिंदुत्वनिष्ठांच्या घोषणा चालूच असल्याने घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *