Menu Close

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावरून डॉ. मिर्झा रफीक याच्याकडून हिंदु प्रेमिकेची गळा दाबून हत्या

जमशेदपूर (झारखंड) येथील लव्ह जिहाद

‘आंतरधर्मीय विवाहांना ‘लव्ह जिहाद’ असल्याचे एका षड्यंत्राद्वारे दाखवण्यात येत आहे’, असे म्हणणारे भाजपचे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुक्तार अब्बास नक्वी आता काही बोलतील का ?

जमशेदपूर (झारखंड) – येथील डॉ. मिर्झा रफीक याने त्याच्या हिंदु प्रेमिकेची एका हॉटेलमध्ये गळा दाबून हत्या केल्याची आणि नंतर तिचा मृतदेह एका बॅगेमध्ये घालून तो रेल्वेरुळावर फेकल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी डॉ. मिर्झा याला अटक केली असून त्याने हत्या केल्याचे मान्य केले आहे. ही प्रेमिका येथे शस्त्रकर्म व्यवस्थापक होती.

३ वर्षांपूर्वी या दोघांनी कोलकाता येथे एकत्र कामाला प्रारंभ केला होता. डॉ. मिर्झा या तरुणीवर सातत्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता; मात्र तरुणीने त्यास नकार दिला होता. याच कारणामुळे तिची हत्या करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *