पॅरीस – फ्रान्समधील व्यंगचित्र नियतकालिक ‘शार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर पुन्हा आक्रमण करण्याची धमकी मिळाली आहे. वर्ष २०१५ मध्ये महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १२ जणांचा मृत्यू झाला होता.
दोन महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप असलेलेे इस्लामी विचारवंत तारिक रमदान यांनी रेखाटलेले व्यंगचित्र शार्ली हेब्दोच्या ताज्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. यात रमदान म्हणत आहेत की, ‘मी इस्लामचा ६ वा स्तंभ आहे.’ तसेच अंकाच्या मुखपृष्ठावर लाल अक्षरांमध्ये ‘बलात्कार’ आणि त्याखाली ‘तारिक रमदान यांचा बचाव’ असे लिहिले आहे.
५५ वर्षीय रमदान ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. रमदान यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावर म्हटले आहे की, ही माझ्या विरोधकांनी चालवलेली खोटारडेपणाची मोहीम आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात