Menu Close

धर्मांधांच्या अत्याचारांमुळे कच्छ (गुजरात) येथील पाकच्या सीमेवरील गावांतून हिंदूंचे पलायन !

अनेक गावे आता १०० टक्के मुसलमानबहुल

हिंदु महिलांवर बलात्कार

केंद्रात आणि गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांनाही हिंदूंना त्यांच्याच देशात विस्थापित व्हावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता उघड करते !

कच्छ (गुजरात) – पाकच्या सीमेलगत असणार्‍या गुजरात राज्याच्या कच्छमधील गावांतून हिंदूंना योजनाबद्धरित्या हुसकावून लावण्याचे कारस्थान धर्मांधांकडून रचण्यात आले आहे. या गावांना मुसलमानबहुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा परिणामही दिसू लागला असून काही गावांतून सर्व हिंदु कुटुंबियांनी पलायन केल्याने ती गावे आता १०० टक्के मुसलमानबहुल झाली आहेत, तर काही गावांमध्ये आता ८० टक्के मुसलमान झाले आहेत. या संदर्भातील विशेष वृत्त ‘रिव्होल्ट प्रेस’ या वृत्तसंकेतस्थळाने गुप्तचर यंत्रणा आणि सैन्य यांच्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिले आहे. हिंदूंच्या या पलायनाची माहिती गुप्तचरांनी सरकारला अहवालाद्वारे दिलेली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

१. येथील दिनारा गावामधील ३०० पैकी १०० घरे हिंदूंची होती. येथे भूकंपामुळे सर्व घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातच धर्मांधांचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार होत आहेत. प्रतिदिन हिंदु मुलींचे लैंगिक शोषण होत आहे. यामुळे येथील हिंदूंनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी भुज येथील मोकळ्या भूमीवर नवीन गाव वसवले आहे. त्याला त्यांनी ‘मेघ मारू वास’ असे नाव दिले आहे. गावातून पलायन करणारे दलित आहेत. कारण सवर्णांनी यापूर्वीच गाव सोडले आहे.

२. दीनारा गावामधील ६५ वर्षीय ग्रामस्थ गंगाराम लहान मुलासारखे रडत रडत म्हणाले की, आमच्या १७-१८ पिढ्या या भूमीवर राहिल्या आहेत. आता तिला सोडावे लागत आहे. अनेक नैसर्गिक आघातांच्या वेळी आम्ही येथेच राहिलो; मात्र धर्मांधांचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन होऊ शकत नाहीत. त्यामुळे गाव सोडण्यावाचून दुसरा पर्याय नाही.

दीनारा गावामध्ये रामदेवाचे मंदिर आहे. याविषयी गंगाराम म्हणाले, ‘‘आज आम्ही या मंदिराचे संरक्षण करू शकत नाही. ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये हिंदूंना अत्याचार करून पळवून लावण्यात आले, त्याचप्रमाणे आम्हाला येथे धर्मांधांकडून पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे. येथील धर्मांध अफगाणिस्तानमधील तालिबान्यांप्रमाणे आहेत. आम्हाला इस्लाम स्वीकारण्याची धमकी देत आहेत. आमच्या महिलांवर बलात्कार करत आहेत. आम्ही कधीपर्यंत हे सहन करत रहाणार ?  आम्हाला पोलिसांचे संरक्षण मिळाले, तरी आम्ही येथे रहाणार नाही.’’

३. दीनारा गावाप्रमाणेच इतर अनेक गावांची स्थिती आहे. गेल्या महिन्याभरात घ्रोषणा, कुरन, कुजरियां आदी गावांतून हिंदूंनी पलायन करणे चालू केले आहे. सीमेवरील गावांना हिंदूविहिन बनवण्यात येत आहे.

४. गुप्तचर यंत्रणेतील निवृत्त अधिकार्‍याने सांगितले की, कच्छच्या सीमेलगत असणार्‍या गावांमधून हिंदूंची संख्या झपाट्याने अल्प होत आहे. हिंदूंना धमकी देऊन गाव सोडण्यास बाध्य केले जात आहे. जे त्यांची दादागिरी सहन करत नाहीत, त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार घातला जातो. ही गावे आधीपासून मुसलमानबहुल असल्याने ते हिंदूंच्या घरात अवैध शस्त्रे, तस्करीचे साहित्य लपवून ठेवतात. ज्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होईल. हिंदूंमध्ये इतकी दहशत निर्माण करण्यात आली आहे की, हिंदू पोलिसांना सत्य माहिती देऊ शकत नाहीत.

धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंकडून सैन्यालाही माहिती देण्यास नकार

सीमेवरील सैन्याचे अधिकारी हिंदूंकडे गाव सोडण्याचे कारण विचारतात तेव्हा हिंदू त्यांना सत्य माहिती देऊ शकत नाहीत. एका सैन्याधिकार्‍याने सांगितले की, आम्हाला माहिती आहे की, हिंदू येथून पलायन करत आहेत; मात्र जेव्हा आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हिंदूंनी काहीही सांगण्यास नकार दिला. ही राष्ट्रविरोधी कृती बंद होण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न झाले पाहिजे.

‘अल् हदीस’ आणि ‘तबलीगी जमात’ या जिहादी संघटनांचे प्राबल्य

गुप्तचरांच्या माहितीनुसार ‘अल् हदीस’ आणि ‘तबलीगी जमात’ नावाच्या जिहादी संघटना कच्छमध्ये सर्वाधिक सक्रीय आहेत. सीमेलगतच्या ९५ गावांमध्ये त्या सक्रीय आहेत. ज्या गावांमध्ये हिंदूंची संख्या मुसलमानांच्या तुलनेत अल्प आहे, तेथे हिंदूंना पळवून लावले जात आहे. ते हिंदूंना मुसलमानांच्या इस्लामी परंपरांचे पालन करण्यास सांगतात आणि हिंदूंच्या परंपरा नष्ट करतात. काही गावांमध्ये हिंदू दिवाळी, होळी आदी सण साजरे करू शकत नाहीत. भुज शहराजवळील दयापर नावाच्या गावामध्ये नवरात्रीच्या वेळी काही हिंदु महिला डोक्यावर कलश घेऊन जात असतांना काही धर्मांधांनी त्यांचे कलश हिसकावून ते फोडून टाकले. अशाच घटना अन्य गावांतही झाल्या आहेत. (हिंदूंच्या संघटनांना तालिबानी म्हणणारे पुरो(अधो)गामी या जिहादी संघटनांविषयी कधीच तोंड उघडणार नाहीत ! – संपादक)

सीमेलगतच्या मुसलमानबहुल गावांवर आयएस्आयचे नियंत्रण

सीमेलगतच्या मुसलमानबहुल गावांवर आता आयएस्आयचे नियंत्रण आहे. येथील मदरशांमधून भारतविरोधी शिक्षण दिले जात आहे. याचे एक उदाहरण नुकतेच दिसून आले. सीमा सुरक्षा दलाचे एक अधिकारी आणि काही सैनिक गावामध्ये पाटी आणि पेन्सिल यांचे वितरण करण्यास गेले होते. तेव्हा मदरशांतील एका विद्यार्थ्याला गीत गाण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्याने पाकिस्तानी गीत गायले. १४ ऑगस्ट या पाकच्या स्वातंत्र्यदिनी भुजपासून ५० कि.मी. अंतरावरील खावडा गावामधील एका शाळेतील शिक्षकांनीच विद्यार्थ्यांकडून पाकच्या घोेषणा म्हणून घेतल्या होत्या. ‘आमचे कच्छ आमचे पाकिस्तान’ अशा घोेषणा देण्यात आल्या.

मुसलमानबहुल गावांतून सैन्यावर बहिष्कार !

सीमेलगतच्या या गावांतील हिंदूंकडून पूर्वी सैन्याला साहाय्य केले जात होते. त्यांना हवी ती वस्तू देण्याचा प्रयत्न होत असे. अनेक वेळा पाण्याची व्यवस्था केली जात होती; मात्र आता हिंदूंनी पलायन केल्याने मुसलमानबहुल झालेल्या गावांतून सैन्याला कोणतेही साहाय्य मिळत नाही. त्यांना पाणीही दिले जात नाही. त्यामुळे सैनिकांना पाण्याची सोय स्वतःच करावी लागत आहे. काही मुसलमानबहुल गावांनी तर सरकारी यंत्रणांवर पूर्णपणे बहिष्कार घातला आहे. हाजीपीरजवळील देसरपर, गोतली आदी गावांतील हिंदूंकडून हे साहाय्य पूर्वी मिळत होते. आता तेथेही अशीच स्थिती आहे. (देशातील एखादे गाव जरी हिंदूविहिन झाले, तर काय स्थिती होते याचे हे उदाहरण होय ! सर्वधर्मसमभाव आणि निधर्मीवाद यांचा ढोल बडवणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना ही स्थिती समजेल तो सुदिन ! – संपादक)

पाकचे ‘के-३’ ऑपरेशन

गुप्तचर अधिकारी म्हणाले की, पाकने पूर्वी ‘के-२’ (काश्मीर-खलिस्तान) नावाचे ऑपरेशन चालू केले होते. भौगोलिकदृष्ट्या कच्छला गुजरातपासून वेगळे करणे कठीण नाही. यामुळेच पाकने आता या ऑपरेशनमध्ये कच्छचा समावेश करून त्याचे नाव ‘के-३’ असे दिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *