एकापेक्षा अनेक बायकांशी विवाह करण्याची मुभा असतांनाही अशांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर त्यांना वासनांधच म्हणायला हवे !
मेलबर्न – पुरुषांनी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम झाले पाहिजे; कारण प्रत्यक्षात आता तसे होत नाही. यामुळेच महिलांनी हिजाब परिधान करणे आवश्यक आहे, असे विधान ऑस्ट्रेलियातील इमाम शेख जैन्नादीन जॉनसन यांनी केले आहे. हॉलीवूड निर्माते हार्वे वेन्स्टीन यांनी केलेल्या अनेक तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेवरून इमामाने हे विधान केले आहे.
शरिया कायद्याविषयी बोलतांना इमाम म्हणाले की, महिलांनी बांगड्या घालून सार्वजनिक स्थानांवर जाऊ नये. घरात किंवा पतीसमोर घालणे ठीक आहे; मात्र बाहेर घालणे आणि लोकांना ते दाखवणे योग्य नाही. इस्लाम याला अनुमती देत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात