Menu Close

हेरगिरीच्या आरोपाखाली भारताच्या हमीदला पाकिस्तानात अटक

  • कुठे प्रेयसीला भेटायला गेलेल्या भारतीय युवकाला कारागृहात डांबणारा पाकिस्तान, तर कुठे शत्रूदेश पाकच्या कलाकारांचा आदर करणारा भारत !

  • प्रेयसीसाठी भेटायला गेलेला हमीद ३ वर्षांपासून पाकच्या कारागृहात

हामिद अंसारी

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील प्रेयसीसाठी भेटायला गेलेल्या हमीद नेहाल अन्सारी या भारतीय अभियंत्यावर पाक सैन्याच्या न्यायालयाने हेरगिरीचा गुन्हा दाखल केला असून त्याला ३ वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

सध्या हमीदचे कुटुंबीय त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. फेसबूक या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून हमीदचा पाकिस्तानमधील युवतीशी परिचय झाला. तो तिला भेटण्यासाठी नोव्हेंबर २०१२ मध्ये अफगणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये गेला. तेथे त्याने एका हॉटेलमध्ये वास्तव्य केले.

त्याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पोलिसांनी त्याला पाक सैन्याच्या कह्यात दिले होते. गेल्या ३ वर्षांपासून तो पेशावरच्या कारागृहात खितपत पडला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *