Menu Close

क्रूर टिपू सुलतानची जयंती नव्हे, तर क्रांतीकारकांच्या जयंत्या साजर्‍या करा ! – फुलचंद उबाळे, जिल्हा सचिव, उत्तर-पश्‍चिम मुंबई, भाजप

जोगेश्‍वरी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि बोलतांना फुलचंद उबाळे

जोगेश्‍वरी (मुंबई), ९ नोव्हेंबर (वार्ता.) – आज देशातील निरपराध हिंदूंना वेचून ठार मारले जात आहे; मात्र तरीही बहुसंख्य हिंदू झोपले आहेत. हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. ज्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने हिंदूंच्या हत्या केल्या, त्या टिपूची जयंती का साजरी करायची ? आपण क्रांतीकारकांच्या जयंत्या सन्मानाने साजर्‍या केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर-पश्‍चिम मुंबईचे जिल्हा सचिव श्री. फुलचंद उबाळे यांनी केले. येथे ८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येऊ नये, ताजमहाल म्हणजेच तेजोमहाल अशी हिंदूंची वास्तू आहे का, याविषयीचा सत्य इतिहास जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत तेथे होणारे नमाजपठण बंद करण्यात यावे आणि पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश येथे होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखण्यासाठी शासनाने तत्परतेने कारवाई करावी, या मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या.

आंदोलनात बजरंग दल, विहिंप, हिंदू गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, तसेच भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी चळवळीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

हिंदूंना पूजा-अर्चा करण्यास मिळेल, असा ‘तेजोमहालय’ हवा ! – ब्रिजेश शुक्ला, बजरंग दल

प्रसिद्ध इतिहासतज्ञ पु.ना. ओक यांनी केलेल्या संशोधनावरून ताजमहाल हा तेजोमहालय होता, हे केव्हाच सिद्ध झाले आहे. तेजोमहालयात हिंदूंना पूजा-अर्चा,आरती करण्यास प्रतिबंध केला जातो. प्रत्येक वेळी हिंदूंच्या संदर्भातच दुजाभाव केला जातो. ते थांबण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे. हिंदूंना पूजा-अर्चा करण्यास मिळेल, असा ‘तेजोमहालय’ हवा आहे.

ताजमहालचा सत्य इतिहास समोर येईपर्यंत हिंदूंचा लढा चालूच ! – दिप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समिती

ज्या टिपू सुलतानने सहस्रावधी हिंदूंच्या हत्या केल्या, हिंदूंचे बळजोरीने धर्मांतर केले, मंदिरे तोडली, देवतांच्या मूर्ती तोडल्या, अशा क्रूरकर्मा टिपूची जयंती कशाला साजरी करायची ? ताजमहालचा सत्य इतिहास येईपर्यंत हिंदूंचा लढा चालूच राहील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *