भारतातील एकतरी राजकीय पक्ष असे वचन देतो का ?
काठमांडू – नेपाळमधील एक प्रमुख राजकीय पक्ष असणार्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने देशात लवकरच होऊ घातलेल्या संसद आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुकीसाठी घोषणापत्र प्रकाशित केले आहे. त्यात नेपाळला ‘सनातन हिंदु राष्ट्र’ बनवण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासह लोकशाही, घटनात्मक राजेशाही आणि स्थानिक शासनाला अधिक अधिकार देणे, अशी सांगड घालण्यात आली आहे.
नेपाळचे उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष श्री. कमल थापा यांनी घोषणापत्र सादर करतांना म्हटले की, हे घोेषणापत्र ‘महेंद्र राष्ट्रवाद’ आणि ‘श्री. कोईराला यांचे सलोखा धोरण’ यांचे एकत्रीकरण आहे. त्यामुळे राष्ट्राची एकात्मता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि एकता अबाधित राहील.
तसेच महत्त्वाच्या गोष्टींवर जनतेचा कौल घेणे, महिलांचे सबलीकरण, अल्पसंख्यांकांची सुरक्षा, ग्रामीण भागात अधिकोषांचे जाळेे उभारणे, प्रत्येक नेपाळी नागरिकाला अधिकोषात खाते उघडून देणे इत्यादी वचनांचा यात समावेश आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात