Menu Close

आपत्काळात रक्षणासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण आवश्यक ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात तीन दिवसीय प्रथमोपचार प्रगत प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

श्री. चेतन राजहंस

रामनाथी, गोवा, १० नोव्हेंबर (वार्ता.) – भावी काळ भीषण आहे. या काळात दंगली, महायुद्ध, पूर, भूकंप आदी आपत्ती येतील, असे अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. या आपत्काळात सत्वगुणी लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला प्रथमोपचार आणि आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण शिकणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १० नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय प्रथमोपचार शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराचा उद्देश सांगतांना ते बोलत होते. १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या या शिबिराला भारतभरातून ५५ जण सहभागी झाले.

श्री. राजहंस पुढे म्हणाले,

‘‘वर्ष २०१८ ते वर्ष २०२३ हा काळ तिसर्‍या महायुद्धाचा असणार आहे. या काळात धर्मांध परिस्थितीचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात परकिय आक्रमणे, दंगली करून अराजक माजवतील. अशा स्थितीत धर्मसंस्थापना अर्थात हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी सत्वगुणी मानव म्हणजे साधना करणारे हिंदू यांचे रक्षण करणे, ही काळानुसार साधनाच आहे.’’

शिबिराच्या प्रारंभी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित साधक श्री. ईशान जोशी यांनी शंखनाद केला. शिबिराचे सूत्रसंचालन कु. राशी खत्री यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *