लक्ष्मणपुरी – भारतीय संस्कृतीला वाचवायचे असेल, तर गाय आणि गंगानदी यांना वाचवले पाहिजे. त्यासाठी आम्हाला कार्य करावे लागेल. जर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सहस्र गोरक्षक निर्माण केले, तर संपूर्ण राज्यात ७५ सहस्र गोरक्षक निर्माण होतील, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. ते विश्व हिंदु परिषदेच्या गोरक्षण विभागाने आयोजित केलेल्या गोरक्षण अधिवेशनात बोलत होते.
या अधिवेशनामध्ये गोसेवा आणि गोरक्षण यांसंदर्भात कार्य करणार्या १ सहस्र २०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. (योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून हिंदु धर्म आणि संस्कृती यांसाठी ज्या प्रकारे कार्य करत आहेत, तसे कार्य भाजपचे अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात