• हिंदूंची ३० घरे जाळली
• पोलिसांच्या गोळीबारात १ धर्मांध ठार
भारताच्या शेजारील अन्य धर्मियांच्या देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा सातत्याने छळ होत आहे; मात्र भारत सरकारकडून कधीही हिंदूंवरील अन्यायाचा विरोध करण्यात आलेला नाही किंवा हिंदूंच्या संघटनांकडून हवा तसा दबाव निर्माण झालेला नाही, हे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना लज्जास्पद आहे !
ढाका – फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या अफवेवरून २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात ३० हिंदूंची घरे जाळण्यात आली. तसेच त्यांच्या घरांची लुट करण्यात आली. या वेळी पोलिसांनी धर्मांधांच्या जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात हमीदुल इस्लाम नावाचा आक्रमणकर्ता ठार झाला. ‘ढाका ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना ढाक्यापासून ३०० किमी अंतरावर असणार्या रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपाडा गावामध्ये १० नोव्हेंबरला घडली. पोलिसांनी गोळीबारापूर्वी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच रबरी गोळ्या झाडल्या. यात ५ जण घायाळ झाले.
१. धर्मांधांनी केलेल्या आरोपानुसार ठाकूरबाडीमधील एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी फेसबूकवर अवमानकारक पोस्ट केली होती. त्यामुळे ते संतप्त झाले होते. प्रत्यक्षात ही व्यक्ती या गावामध्ये रहात नाही.
२. हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी ठाकूरबाडी गावाच्या आसपासच्या ६-७ गावांतील सुमारे २० सहस्र धर्मांध एकत्र आले होते. त्यामुळे पोलिसांनाही त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, असे या वृत्तात म्हटले आहे.
३. पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर धर्मांधांनी रंगपूर-दिनाजपूर महामार्ग रोखून धरला. ४ घंटे मार्ग रोखल्यावर पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर तो मोकळा करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात