भारताच्या शेजारील अन्य धर्मियांच्या देशात अल्पसंख्यांक हिंदूंचा सातत्याने छळ होत आहे; मात्र भारत सरकारकडून कधीही हिंदूंवरील अन्यायाचा विरोध करण्यात आलेला नाही किंवा हिंदूंच्या संघटनांकडून हवा तसा दबाव निर्माण झालेला नाही, हे सरकार आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना लज्जास्पद आहे !
नवी देहली – श्रीलंकेतील सैन्याकडून तेथील तमिळी हिंदूंवर अत्याचार होणे हे नवीन राहिलेले नाही. अजूनही हे अत्याचार होतच आहेत. ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलम’ या तमिळी हिंदूंच्या संघटनेला नष्ट करून ८ वर्षे झाल्यानंतरही अजून श्रीलंकेचे सैन्य हिंदूंवर अत्याचार करत आहे. नवीन घटनेमध्ये श्रीलंकेचे सैन्य आणि पोलीस यांनी ५० हून अधिक तमिळी हिंदूंवर अमानुष अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या हिंदूंना ते ‘लिट्टे’चे सदस्य असल्याचे सांगत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. यांतील महिलांवर बलात्कार करण्यात आले. या अत्याचारांची माहिती समोर आल्यावर श्रीलंकेच्या सरकारने याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले होते.
१. या वृत्तात म्हटले होते की, एका तमिळ व्यक्तीने सांगितले की, त्याला लिट्टेचा सदस्य असल्यावरून कारागृहात डांबण्यात आले आणि तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच सिगरेटचे चटकेदेणे आणि पेट्रोल भरलेल्या बॅगेमध्ये डोके घालून ठार मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
२. १९ वर्षांच्या एका तमिळी हिंदु तरुणाने त्याच्या दोन्ही पायांवर ६० हून अधिक सिगरेटच्या चटक्यांचे डाग दाखवले. पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा हा पुरावा होता. त्याच्या छातीवर गंभीर दुखापत होती. त्याचेही लैंगिक शोषण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात