Menu Close

श्रीमंत बाळाजी पेशवे यांच्या जन्मस्थानाची उपेक्षा

पेशव्यांच्या जन्मस्थळाची दुर्दशा पालटण्यासाठी इतिहासप्रेमी संघटित होतील का ?

श्रीमंत बाळाजी पेशवे यांच्या जन्मस्थानाजवळील परिसरात पडलेला कचरा

श्रीवर्धन – मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान असलेले श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव. अपराजित योद्धा बाजीराव यांचे ते वडील. मराठी साम्राज्याचा नावलौकिक वाढवणार्‍या पेशव्यांच्या पदरात स्वातंत्र्योत्तर काळात मात्र उपेक्षाच पदरी पडत आहे. येथील श्रीमंत बाळाजी विश्‍वनाथ पेशवे यांचा वाडा हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. श्रीमंत बाळाजी पेशवे यांच्या वाड्याची पूर्णपणे दूरवस्था झाली असून वाड्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संपूर्ण वाड्याची तटरक्षक भिंत मोडकळीस आली आहे. श्रीवर्धन पर्यटनस्थळ असल्याने त्या ठिकाणी नियमितपणे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. येणारे पर्यटक पेशव्यांची वास्तू पाहण्यासाठी उत्सुकतेने जातात; परंतु तेथे गेल्यावर पर्यटकांना निराश होऊन परतावे लागत आहे. सदर वास्तूचा उपयोग सार्वजनिक कार्यक्रमांसाठी गेले जात असल्याचे निदर्शनास आले.

इतिहासाचे विद्रूपीकरण केल्याने पूर्वजांच्या गौरवशाली इतिहासाविषयी अनेक जण आज अनभिज्ञ आहेत. अशा वेळी या थोर पुरुषांच्या जतन केलेल्या वास्तू, स्मारके यांच्या माध्यमातून गौरवशाली इतिहासाचे जयजयकार व्हावा, अशी अपेक्षा आहे; मात्र दुर्दैवाने या ठिकाणच्या पदरी केवळ तटबंदी, कुलुपबंद वास्तू आणि एक पूर्णाकृती पुतळा एवढेच वाट्याला आले आहे. पेशव्यांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरात त्यांचे कर्तृत्व दर्शवणारी विशेष ओळख नसणे खेदजनक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *