१९ नोव्हेंबरला जळगाव येथे ‘हिंदु धर्मजागृती सभा’ !
जळगाव, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त प्रसार करतांना धर्माभिमानी हिंदू आपल्या परिचयातील रिक्शाचालकांनाही रिक्शांवर भित्तीपत्रके लावण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे अल्प कालावधीत व्यापक प्रचार होत आहे. जे रिक्शाचालक कधीच रिक्शावर कोणतेही भित्तीपत्रक लावत नाहीत, त्यांनीही आवर्जून भित्तीपत्रक मागून घेतले आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये मोठी १५ होर्डिंग लावण्यात आली आहे.
१. दैनिक तरुण भारतने ‘लव्ह जिहाद’विषयी रणरागिणी शाखेच्या राज्य संघटक कु. प्रतिक्षा कोरगावकर यांची मुलाखत घेऊन ती चांगल्या प्रकारे प्रसिद्ध केली.
२. भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमांतूनही धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात येत आहे.
३. एका कार्यकर्त्याच्या नातेवाइकांच्या लग्नपत्रिकेतूनही धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
४. सामाजिक संकेतस्थळांद्वारे व्यापक प्रमाणात प्रसार करण्यात येत असून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चित्रे आणि चित्रफीतीही पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे ७० सहस्र, तर फेसबूकच्या माध्यमातून ७७ सहस्र ३२८ लोकांपर्यंत धर्मजागृती सभेचा विषय पोहोचला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात