Menu Close

दर्यापूर (अमरावती) येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्यापूर, अमरावती येथे १२ नोव्हेंबर या दिवशी ‘हिंदु धर्मजागृती सभा’ !

सभेनिमित्त आयोजित वाहनफेरीमध्ये १५० धर्मप्रेमींचा सहभाग

अमरावती – दर्यापूर, अमरावती येथे धर्मप्रेमींच्या पुढाकाराने आयोजीत हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त १० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या मैदानावरून वाहनफेरीला प्रारंभ करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ श्री. श्यामराव देशपांडे, श्री. राजूभाऊ पातुरकर, तसेच ऑटो युनियन अध्यक्ष श्री. संजय राणे यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहने चालवून पोलिसांना सहकार्य केले आणि पोलिसांनीही वाहनफेरीसाठी सहकार्य केले. सर्वांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

वाचनालयाच्या मैदानावरच वाहनफेरीची सांगता करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु धर्मजागृती सभेचे महत्त्व सांगितले आणि १२ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. धर्मप्रेमी श्री. संदीप राजगुरे यांनी वाहनफेरीचे आभार प्रदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *