मुंबई येथे राजपूत सेवा संघाचे १५ कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात
• अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्यास होणार्या परिणामांची जाणीव असल्याने त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न कोणी करत नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
• हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच भावना दुखावल्या जातात आणि त्या विरोधात हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवल्यास हिंदूंवरच कारवाई केली जाते, हे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदूंच्या मतांवर निवडून येणारे शासनकर्ते यांना लज्जास्पद !
मुंबई – पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत असून १२ नोव्हेंबरला मुंबई येथे चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या घरासमोर अखंड राजपूत सेवा संघाने आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी १५ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
सुरत (गुजरात) येथे राजपूत संघटना, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि करणी सेना या संघटनांनी आंदोलन केले. हा चित्रपट नाही, तर इतिहास आहे. चित्रपटाच्या नावाने काहीही दाखवू शकत नाहीत, असे करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी या वेळी सांगितले. या चित्रपटाच्या प्रदर्शनला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका प्रविष्ट करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला, असे वाटत असतांना विविध संघटनांनी चित्रपटाला आपला विरोध कायम ठेवला आहे. (जे स्वत: कोणताही इतिहास निर्माण करू शकत नाहीत; त्यांच्याकडून देशाच्या खर्या इतिहासाची मोडतोड करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला जातो, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात