कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाचा बळी !
• सिन्हा सरन्यायाधीश झाल्यापासून बांगलादेशातील धर्मांधांकडून आणि त्यांच्या संघटनांकडून त्यांना विरोध करण्यात येत होता. त्याचाच परिणाम म्हणून सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांना फसवण्यात आल्याची शक्यता आहे !
• भारतात राष्ट्रपती ते महापौर आदी पदांचे लाभ मुसलमानांना मिळाले आहेत; मात्र त्याला कोणी विरोध केला नाही; कारण या देशातील हिंदु सहिष्णु आहेत, हे पुरो(अधो)गामी यांनी लक्षात ठेवायला हवे !
ढाका – बांगलादेशाचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक मासापासून ते सुट्टी काढून परदेशात गेले होते. सुट्टी संपताच ऑस्ट्रेलियातून त्यांनी राष्ट्रपती अब्दुल हामिद यांच्याकडे त्यागपत्र पाठवले.
१. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ वरिष्ठ न्यायाधिशांनी सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करत त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता.
२. सर्वोच्च न्यायालयाने जुलै मासात एका निकालात न्यायाधिशांवरील महाभियोगसंबंधीचे संसदेचे अधिकार संपुष्टात आणण्याचा निर्णय दिला होता. तेव्हापासून त्यांचा सरकारबरोबर सातत्याने वाद चालू होता.
३. सिन्हा यांनी १७ जानेवारी २०१५ मध्ये बांगलादेशाचे २१ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी ३१ जानेवारीला पूर्ण होणार होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात