पॅरिसमध्ये असे होऊ शकते; मात्र भारतात असे केले जात नाही; कारण भारत निधर्मी देश आहे ! कायद्यापेक्षा अल्पसंख्यांकांची मर्जी सांभाळणे हे राजकीय दायित्व आहे !
पॅरिस – फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मुसलमानांना रस्त्यावर नमाज पठणास मनाई करण्यात आली आहे. शुक्रवार, १० नोव्हेंबरला पॅरिसच्या उत्तरेकडे असणार्या क्लिचे उपनगरात नमाज पठणासाठी रस्त्यावर आलेल्या १०० मुसलमानांना येथील विभागीय सरकारचे प्रमुख वालेरिए पेक्रेसे यांच्या नेतृत्वाखाली २०० लोकप्रतिनिधींनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर येथे फ्रान्सचे राष्ट्रगीत गाण्यात आले. विरोध करण्यासाठी महापौर रेमी मुजेआऊ यादेखील उपस्थित होत्या.
मार्च मासापासून प्रत्येक शुक्रवारी क्लिचे उपनगरात रस्त्यावर नमाज पठण करण्यात येत आहे. या भागातील सरकारी जागेमध्ये असलेली मशीद बंद केल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी स्थानिक मुसलमानांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. (प्रथम कायदाद्रोही कृती करायची आणि त्याच्यावर कारवाई केली, तर त्याला विरोध करायचा, अशाप्रकारे कायद्याचे पालन न करणार्यांना कारागृहातच डांबायला हवे ! – संपादक) शहरातील नागरिकांना स्वातंत्र्य देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. सार्वजनिक ठिकाणी अशी कृती करण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी महापौर रेमी मुजेआऊ यांनी सरकारकडे केली आहे. पेक्रेसे म्हणाले की, सार्वजनिक स्थळावर अशा प्रकारे अतिक्रमण केले जाऊ नये.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात