Menu Close

राजस्थानातील शाही कुटुंबांचा ‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध

चित्रपट परिनिरीक्षण मंडळ याची नोंद घेणार का ?

मुंबई – संजय लीला भन्साळीकृत पद्मावती या वादग्रस्त चित्रपटाच्या विरोधात राजस्थानातील सर्व शाही कुटुंबे एकवटली असून ‘राणी पद्मावती हिचे चुकीचे चित्रण खपवून घेतले जाणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

करणी सेनेने राज्यातील सर्व चित्रपटगृहांना पत्र लिहून हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची चेतावणी दिली आहे. चित्रपटाच्या संदर्भातील वाद मिटेपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय राज्यातील चित्रपट वितरकांनी घेतला आहे. ‘राणी पद्मावती यांनी केलेल्या जोहरची कथा प्रेमकथेच्या रूपाने दाखवणे अत्यंत चुकीचे आहे. एखाद्या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीच्या स्वरूपात दाखवल्यास चित्रपट परिनिरीक्षण मंडळ तो चित्रपट संमत करेल का ?’ असा प्रश्‍न शाही कुटुंबांनी विचारला आहे.

पद्मावती चित्रपटाच्या निषेधार्थ ठाणे येथे निदर्शने

ठाणे, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – पद्मावती चित्रपटाच्या निषेधार्थ १० नोव्हेंबर या दिवशी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विविध संघटनांनी निदर्शने केली. यामध्ये राजस्थान राजपूत परिषद (मुंबई), रूद्र प्रतिष्ठान, श्री राजपूत क्षत्रिय गौरव ट्रस्ट, करणी सेना, मारवाडीज इन, राष्ट्रीय करणी सेना, राम सेना, श्री जैन श्‍वेतांबर तेरापंथी सभा, हम हिंदुस्थानी, जागृत भारत, हिंदू एकता, अग्रवाल समाज, राजस्थान प्रगती मंडळ, ठाणे सिटी ज्वेलर्स असोसिएशन, जाल्लोर सिरोही विकास परिषद आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

राणी पद्मावती ही वीर योद्धा होती. अल्लाउद्दिन खिलजी याच्या हाती लागण्यापेक्षा स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी राणी पद्मावती हिने सहस्रावधी महिलांसह अग्निसमर्पण केले. अशा राणी पद्मावतीच्या विकृतीकरणाच्या निषेधार्थ हीे निदर्शने करण्यात आली.

पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्याची राजपूत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची मागणी !

संभाजीनगर येथे आंदोलन !

संभाजीनगर/ नाशिक – ‘पद्मावती चित्रपटावर बंदी झालीच पाहिजे’, ‘एक दो एक दो भन्साळी को फेक दो’, ‘भन्साळीचे करायच काय ? खाली डोके वर पाय’, ‘पद्मावती चित्रपट बंद झालाच पाहिजे’, ‘निषेध, निषेध भन्साळीचा निषेध’ अशा घोषणा देत संभाजीनगर आणि नाशिक येथे हिंदुत्वनिष्ठांनी पद्मावती चित्रपटाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले.

संभाजीनगर येथे शहरातील युवकांनी पंचायत समिती, महाराणा प्रताप पूल ते उपविभागीय कार्यालय, तसेच डॉ. आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालय या परिसरात निषेध मोर्चा काढला आणि पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला कडाडून विरोध केला. या वेळी संजय भन्साळीचा निषेध व्यक्त करण्यात आला. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार डी.डी. खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लांजेवार-नांदेडकर आणि तहसीलदार दिपाली खर्डेकर यांना लेखी निवेदन देऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी या वेळी करण्यात आली. संभाजीनगर तालुक्यातील राजपूत परदेशी समुदायाचे युवकांसह ज्येष्ठ नागरिकही या मोर्च्यात सहभागी झाले होते. मराठा स्वराज्य ग्रुप, भाजपा युवा मोर्चा, महाराणा युवक संघटना या संघटनांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *