निळे (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग
निळे (जिल्हा कोल्हापूर), १२ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु धर्मामध्ये मोठे सामर्थ्य आहे. येणार्या आपत्काळात पदवी किंवा पैसा नव्हे, तर केवळ आपले ‘धर्मबल’ रक्षण करेल, असे प्रतिपादन शाहिरी संघटनेचे अध्यक्ष आणि संघटक श्री. दगडू पाटील यांनी केले. येथील श्री जोतिबा मंदिरात झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते. सभेचा प्रारंभ शंखनादाने झाला. त्यानंतर ग्रामदैवत श्री जोतिबाचे पूजन मंदिराचे मानकरी माजी सरपंच श्री. तानाजी पाटील यांच्ये हस्ते झाले. या वेळी सरपंच श्री. संजय पाटील, ग्रामस्थ सर्वश्री किसन कुंभार, वसंत कुंभार हे उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. धर्मप्रेमी आणि व्यावसायिक श्री. अशोक कुंभार यांनी सभेत मनोगत व्यक्त करतांना हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचे आवाहन केले.
धर्महानी रोखणे ही साधना ! – किरण दुसे
पुरुषांनी कपाळाला टिळा लावल्याने शिव तत्त्वाचा, तर महिलांनी कुंकू लावल्याने वातावरणातील दुर्गादेवीच्या तत्त्वाचा लाभ होतो. जन्मदिन साजरा करणे, देवळात दर्शन घेणे, नमस्काराची योग्य पद्धत समजून नमस्कार करणे आदी धार्मिक कृतींमागील शास्त्र समजून घेऊन कृती केल्यास त्याचा अधिक लाभ होतो. धर्मावर होणारे आघात, उदा. लव्ह जिहाद, गोहत्या, हिंदूंच्या देवतांचे विडंबन यांविषयी प्रबोधन करून धर्महानी रोखणे ही साधना आहे.
निळे येथे मागील २ मासांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. धर्मशिक्षणवर्गाला येणार्या धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे या धर्मजागृती सभेचे आयोजन केले होते. सभा यशस्वी होण्यासाठी संरपंच श्री. संजय पाटील, धर्मप्रेमी सर्वश्री दिलीप कुंभार, आशिष कोळवणकर, जितेंद्र पंडीत, विजय मोरबाळे, देसाई, अजय पाटील, कुमार लाड, अशोक कुंभार यांनी विशेष प्रयत्न केले.
विशेष
सभेच्या निमंत्रणासाठी सरपंच श्री. संजय पाटील यांनी गावात दवंडीद्वारे निमंत्रण देण्यास सांगितले. त्यानुसार ग्रामपंचायतक्षेत्रात दवंडीद्वारे सभेचे निमंत्रण देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात