Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाला हातभार लावणार ! – जळगाव बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता आर.आर. महाजन

१९ नोव्हेंबरला जळगाव येथे ‘हिंदु धर्मजागृती सभा’ !

डावीकडून अधिवक्ता सुभाष तायडे, अधिवक्ता आर.आर. महाजन, श्री. सुनील घनवट आणि अधिवक्ता निरंजन चौधरी

जळगाव, १२ नोव्हेंबर (वार्ता.) : येथील जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता आर. आर. महाजन यांची जळगाव येथील धर्मजागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली. त्या वेळी श्री. महाजन यांनी सभेला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

अधिवक्ता आर.आर. महाजन म्हणाले, ‘‘समितीच्या सुराज्य अभियानाला आमचा पूर्ण पाठिंबा असून धर्मकार्यासाठी आम्ही नेहमी सिद्ध आहोत. या धर्मजागृती सभेसाठी जिल्ह्यातील सर्व अधिवक्त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत. या सभेला सर्व उपस्थित रहातील याचे नियोजन करत आहोत.’’ शहरातील काही धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी समितीच्या संपर्क कार्यालयाला भेट देऊन सांगितले की, धर्मजागृती सभेचे निमंत्रण आम्ही सर्व अधिवक्त्यांना सांगून कुटुंबासहित उपस्थित राहण्याची विनंती करू.

क्षणचित्र : या वेळी अधिवक्त्यांनी सभेनिमित्त केलेल्या एका चलचित्राच्या चित्रीकरणामध्ये सहभाग घेऊन जळगाव येथील नागरिकांना १९ नोव्हेंबरला होणार्‍या विराट हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. ही ध्वनीचित्रफीत सर्व हिंदु बांधवांपर्यंत पोहोचवू, असे त्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *