‘भूमी जिहाद’च्या विरोधात ग्रामस्थांकडून संघटितपणे प्रशासनाकडे तक्रार
धर्मांधांकडून शासकीय भूमी हडपली जात असतांनाही ते प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही ? कि प्रशासकीय अधिकार्यांचे धर्मांधांवर कारवाई करण्याचे धाडस होत नाही ! याला उत्तरदायी असणार्या अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
खर्डा (जिल्हा नगर) : शासकीय योजनेतील सभामंडप आणि पुष्कळ मोठा शासकीय भूखंड मदरसा संचालक सय्यद मंझर सय्यद उस्मान याने बळकावल्याची तक्रार योगेश सुरवसे आणि खर्डा ग्रामस्थ यांनी नगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे. एवढेच नव्हे, तर सार्वजनिक असलेली पाण्याची विहीर परस्पर बुजवून तो भूखंडही हडपल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गावातील अन्य एका धर्मांधाने सार्वजनिक तालीम पाडून वैयक्तिक बांधकाम करून तिथे मांसाहार विक्रीचे दुकान थाटले आहे.
या प्रकरणी प्रशासनाने २० दिवसांच्या आत मदरसा संचालक सय्यद मंझर सय्यद उस्मान आणि कुटुंबीय, तसेच आझाद गनीभाई सय्यद यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे प्रविष्ट करून त्यांनी बळकावलेली भूमी परत घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ग्रामस्थांनी तक्रारीतून दिली आहे. (प्रत्येक वेळी जनतेलाच कारवाईची मागणी का करावी लागते? एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय भूमी हडपल्या जात असतांना प्रशासकीय अधिकार्यांना माहितीच नसेल, तर असे अधिकारी हवेतच कशाला? अशा वारंवार होणार्या आघातांना कंटाळून जनतेनेच आवाज उठवला, तर आश्चर्य वाटायला नको ! – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात