चित्रपटाच्या विरोधात २० नोव्हेंबरला आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन
मुंबई : पद्मावती चित्रपटातून राणी पद्मावती हिच्या अवमानाविषयी तीव्र संताप व्यक्त करत १२ नोव्हेंबर या दिवशी सकाळी काळबादेवी येथील मुख्य रस्त्यावर राजपूत समाजाच्या आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी चित्रपट दिग्दर्शक संजय भन्साळी यांचा पुतळा जाळला. संतप्त जमावाने भन्साळी याच्या पुतळ्याला जोड्याने मारून ‘मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. या वेळी भाजपचे आमदार राज पुरोहित उपस्थित होते.
यानंतर आमदार राज पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली येथील भारत भवन येथे बैठक झाली. या बैठकीत २० नोव्हेंबरला दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात समस्त राजपूत संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी होऊन पद्मावती चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments