Menu Close

कर्णावती येथील मुसलमानांच्या घरांवरील विशिष्ट खुणेमुळे कथित भीतीचे वातावरण !

केवळ कोणीतरी विशिष्ट खूण केली म्हणून भीती वाटणार्‍यांनी, काश्मीरमध्ये मशिदीतून हिंदूंना बायका आणि संपत्ती सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तेव्हा हिंदूंची काय स्थिती झाली असेल, याचा विचार कधी केला आहे का ? अजूनही तेथे हिंदूंना परत येण्यास विरोध केला जात आहे, हे माहीत आहे का ?

• देशातील ९० जिल्हे मुसलमानबहुल झाले आहेत. अशा ठिकाणचे हिंदू कशा स्थितीत रहातात, हे त्यांना माहिती आहे का ?

• आम्ही बहुसंख्य हिंदूंच्या सावटाखाली आहोत, अशा बोंबा मारण्यासाठी त्यांनीच स्वतःहून या खुणा केल्या असतील, असे कोणाला वाटल्यास चुकीचे ते काय !

कर्णावती (गुजरात) : कर्णावती शहरातील पलदी परिसरातील मुस्लिम सोसायटी आणि हिंदु कॉलनी येथील घरांवर लाल रंगाच्या Xच्या खुणा करण्यात आल्या आहेत. यामुळे येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत, असे म्हटले जात आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी मुसलमान वस्ती निर्माण होत आहे, अशा आशयाचे भित्तीपत्रक लागले होते. त्यामुळे येथील वातावरण भीतीदायक आणि तणावपूर्ण आहे; मात्र या खुणा आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी केल्या आहेत, असे पोलीस आयुक्त ए.के. सिंह यांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

१. मुसलमानबहुल परिसराची ओळख व्हावी, या हेतूने येथील घरांवर खुणा केल्या असाव्यात, अशी शंका रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याविषयी त्यांनी निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्त यांना पत्रही पाठवले आहे. परिसरातील शांतता भंग करण्याचा कट असावा, असेही त्यात म्हटले आहे.

२. अमन कॉलनी, नशेमॅन अपार्टमेंट, टागोर फ्लॅट, आशियाना अपार्टमेंट आणि तक्षशिला कॉलनी यांच्या बाहेरील प्रवेशद्वारांवरही अशा प्रकारच्या खुणा केल्या आहेत.

३. काही दिवसांपूर्वी याच परिसरात पलदीचा जुहापुरा होण्यापासून वाचवा, असे लिहिण्यात आलेले भित्तीपत्रक लावण्यात आले होते. जुहापुरा ही भारतातील सर्वात मोठी मुसलमानबहुल वस्ती आहे. त्यामुळे पलदी येथे मुसलमानांची सर्वात मोठी वस्ती होत आहे, अशी चेतावणी त्यातून देण्यात आली होती, असे काही रहिवाशांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *