ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : येथे १२ नोव्हेंबर या दिवशी स्वराज्य जनरल कामगार सेना या संघटनेची कार्यशाळा पार पडली. यात संघटनेचे २० गावांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. ही संघटना असंघटित कामगारांसाठी काम करते. त्यांना शासकीय अनुदान मिळवून देणे आणि त्याची माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. या शिबिराच्या माध्यमातून संघटनेचे कार्य आणि शासनाच्या विविध योजना यांची माहिती सांगण्यात आली.
या शिबिरात हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात आले होते. समितीच्या वतीने श्री. संतोष देसाई, श्री भरत जैन, अधिवक्त्या (सौ.) भारती जैन उपस्थित होते. श्री. संतोष देसाई यांनी ‘गुणसंवर्धन’ या विषयावर माहिती सांगितली. अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांनी गुणसंवर्धनासाठी साधनेचे महत्त्व सांगितले. शेवटी संघटनेचे अध्यक्ष श्री. अमितदादा कदम यांनी समितीचे आभार मानून सत्कार केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात