-
१२५ धर्माभिमान्यांची उपस्थिती
-
नायजेरियन लोकांच्या राष्ट्रविघातक कारवायांच्या विरोधात नालासोपारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांचा बुलंद आवाज !
नालासोपारा : वसई, विरार क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये नायजेरियन नागरिकांवर दखलपात्र गुन्ह्याची नोंद असतांनासुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. पोलिसांच्या पाठबळामुळे नायजेरियन इतके मदमस्त झाले आहेत की, ते पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भारतीय नागरिकांचा ब्लडी इंडियन, असा उल्लेख करतात. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळेच मुंबईत नायजेरियन नागरिकांच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या विशिष्ट नियोजन करून वाढवण्यात येत आहे. अनैतिकरित्या वसई, विरार येथे रहाणार्या नायजेरियन नागरिकांवर पोलीस-प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. जर प्रशासन याची नोंद घेत नसेल, तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ नायजेरियन नागरिकांना धडा शिकवतील, अशी चेतावणी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. शिवकुमार पांडे यांनी दिली. १२ नोव्हेंबर या दिवशी नालासोपारा, पंचमुखी हनुमान मंदिर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
विविध राज्यांत होत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखाव्यात, ताजमहल येथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्याची अनुमती मिळावी आणि अनैतिक धंदे करणार्या नायजेरियन नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बजरंग सेवा दल, हिंदू गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था, परशुराम सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मिळून १२५ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
यापुढे ताजमहलचा उल्लेख तेजोमहल असा करावा ! – डॉ. सुजित यादव, हिंदुत्वनिष्ठ
हिंदूंच्या पवित्र मंदिरांना तोडून मोगलांनी मशिदी बांधल्या आहेत. अयोध्येत बाबरी मशीद श्रीराम मंदिराच्या जागेत आहे, हे जसे मानायला सरकार सिद्ध नाही, तसेच ताजमहलाच्या विषयी दिसून येत आहे. सर्व हिंदूंनी एकमुखाने आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून याचा विरोध केला पाहिजे. ताजमहाल मकबरा नसून ते शिवाचे मंदिर आहे. त्यामुळे यापुढे ताजमहलचा उल्लेख तेजोमहाल म्हणूनच करावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात