राजस्थानी हिंदु समाजाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर : इतिहासाची विकृती करणार्या पद्मावती चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदु समाज कोल्हापूरच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
निवेदन देतांना शांतीलाल पुरोहित, रमेश पुरोहित, मोहब्बतसिहं देवल, हिरालाल लोहार, ललित गांधी, गुलाबसिंह देवडा, रामसिंग देवल, नगरसेवक ईश्वर परमार, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रात म्हटले आहे की…
१. या चित्रपटामुळे धर्मावर श्रद्धा असणारे आणि संस्कृतीवर प्रेम करणारे हिंदू यांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. चित्रपटामुळे राज्यातील वातावरण बिघडू शकते.
२. महाराष्ट्रात पद्मावती चित्रपटावर त्वरित बंदी आणावी. कुणालाही हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही.
३. आमचा मनोरंजनाला विरोध नाही; मात्र मनोरंजनाच्या नावाखाली भारताचा इतिहास आणि संस्कृती यांचे विकृतीकरण होत असेल, तर त्यावर बंदी आणणे योग्य आहे.
४. इतिहासाशी छेडछाड करण्याची कुणालाही अनुमती नाही; मात्र संजय लीला भन्साळी यांचा हेतू केवळ व्यावसायिक आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात