कर्नाटक पोलिसांची दडपशाही !
- हिंदूंवर दडपशाही करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांना संरक्षण पुरवतात, हे लक्षात घ्या !
- हिंदू असंघटित असल्यामुळेच पोलीस अशी दडपशाही करतात, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ?
- हिंदूंनो, अशा प्रकारे धर्मकार्यात नाहक अडथळे आणणार्या पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा आणि त्याची माहिती सनातन प्रभातलाही कळवा !
तुमकूर (कर्नाटक) : येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याकरता पोलीस उपअधीक्षकांकडून अनुमती देण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष आंदोलन चालू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन ध्वनीक्षेपक यंत्रणा, कापडी फलक आणि प्लेकार्ड जप्त केले.
८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता ७ साधक आंदोलनस्थळी पोहोचले होते. तेवढ्यात पोलीस उपनिरीक्षक तेथे आले. त्यांनी आंदोलनासाठी पोलिसांच्या अनुमतीपत्राविषयी विचारले. अनुमतीपत्र मंदिरात गेलेल्या कार्यकर्त्यांकडे होते. तेव्हा पोलिसांनी अनुमती नसल्याचे कारण पुढे करत आंदोलनाचे सर्व साहित्य जप्त करून त्यांच्या वाहनात टाकले. काही वेळाने समितीच्या कार्यकर्त्याने अनुमतीपत्र दाखवल्यावर पोलीस उपनिरिक्षकांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि कापडी फलक दिला; मात्र फलक देण्यास नकार दिला. ११ नोव्हेंबरनंतर फलक घेऊन जाण्यास सांगितले. या वेळी पोलिसांनी आंदोलनाला आलेले धर्माभिमानी, धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे ३ कार्यकर्ते यांची नावे नोंद करून घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात