Menu Close

(म्हणे) ‘कुंभमेळ्यावर लास वेगाससारखे आक्रमण करू !’ – इसिसची धमकी

जिहादी आतंकवादी भारतात आक्रमण करतांना हिंदूंना लक्ष्य करतात, तरी भारतातील पुरो(अधो)गामी म्हणतात ‘आतंकवाद्यांना धर्म नसतो !’

• कुंभमेळ्यावरील आक्रमणाच्या धमकीचा अल्पसंख्यांक आणि त्यांच्या संघटना विरोध करून ते त्यांचा ‘बंधूभाव’ दाखवतील का ?

नवी देहली : कुंभमेळा आणि त्रिशूरपुरम् यांवर लास वेगाससारखे आक्रमण करू, अशी धमकी इसिसकडून देण्यात आली आहे.

१० मिनिटांच्या मल्याळम भाषेतील एका ध्वनीफितीच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषासुद्धा यामध्ये करण्यात आली आहे. लास वेगासमध्ये ५८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ५४६ लोक घायाळ झाले होते.

१. या ध्वनीफितीमधील आवाज राशिद अब्दुल्ला या आतंकवाद्याचा असल्याचे सांगितले जात आहे. राशिद इसिसच्या केरळच्या कासरगोड मॉड्युलचा सदस्य आहे. तो इसिसमध्ये भरती होण्यासाठी अफगाणिस्तानला गेला होता. (केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आघाडी सरकार आहे. पूर्वी येथे काँग्रेसचे आघाडी सरकार होते. त्यांच्या लांगूलचालनामुळेच भारताच्या अन्य राज्यांच्या तुलनेत केरळमधूनच इसिसमध्ये सर्वाधिक मुसलमान भरती झाले, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. या ध्वनीफितीमध्ये कुराणचा उल्लेेख करण्यात आला आहे. सध्या ही ध्वनीफीत व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

३. ‘तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा. त्यांच्या जेवणात विष टाका. ट्रकचा वापर करा. कुंभमेळा आणि त्रिशूरपुरम मध्ये ट्रक घुसवा. इसिसकडून या मार्गांचा वापर जगभरात केला जात आहेे. लास वेगासमध्ये इसिसच्या समर्थकाने संगीत रजनीमध्ये गोळीबार करून अनेकांना ठार केले. तुम्ही किमान रेल्वे गाड्या रूळावरून घसरण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. चाकूचा वापर करून आक्रमण करायला हवेत,’ अशी चिथावणी या ध्वनीफितीतून देण्यात आली आहे. (अशा आक्रमणांपासून बचाव होण्यासाठी भारतातील सुरक्षायंत्रणा आणि नागरिक सतर्क आणि सक्षम आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

४. एकाच व्यक्तीकडून आक्रमणे करण्याच्या पद्धतीचा सध्या इसिसकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *