Menu Close

मालमत्ता कह्यात घेतल्यास मुंबईतील वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटांची पुनरावृत्ती करू ! – दाऊदच्या साथीदाराची धमकी

आतंकवादी दाऊदचे सहकारी भारताबाहेर राहून भारतात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देतात, हे देशाच्या सुरक्षायंत्रणांचा त्यांना धाक नसल्याचे द्योतक आहे. आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शासनकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

मुंबई : दाऊद इब्राहिम याची मालमत्ता कुणी कह्यात घेतली, तर मुंबईत वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटाची पुनरावृत्ती घडवून आणू, अशी धमकी दाऊद याचा साथीदार उस्मान चौधरी याने १४ नोव्हेंबरला रात्री उशिरा एका वृत्तवाहिनीला दूरभाषवरून दिली.

दाऊद याच्या येथील मालमत्तांचा लिलाव करण्यात आल्याने ही मालमत्ता कुणीही कह्यात घेऊ नये, यासाठी त्याच्या साथीदाराकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. ‘वर्ष २००२ आणि २०१५ मध्ये झालेल्या दाऊद याच्या मालमत्तेच्या लिलावाच्या वेळी दाऊद याचा भाऊ अनीस आणि छोटा शकील यांनी ‘भाईची मालमत्ता दुसर्‍यांच्या कह्यात जाऊ नये’, असा त्यांच्या साथीदारांना आदेश होता. त्या वेळीही बोली लावणार्‍यांना धमक्या आल्या होत्या’, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *