चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा ख्रिस्ती नागरिकांना आदेश
भारतातील ख्रिस्त्यांना आणि माओवाद्यांना साहाय्य करणार्या धर्मांध ख्रिस्त्यांना हे मान्य आहे का ?
बीजिंग : येशू ख्रिस्त नव्हे, तर शी जिनपिंगच तुमची गरिबी दूर करू शकतात. त्यामुळे येशू ख्रिस्त याचे चित्र काढून तेथे जिनपिंग यांचे चांगले छायाचित्र लावा. येशू तुमची गरिबी किंवा आजारपण दूर करू शकत नाही; पण कम्युनिस्ट पार्टी तुम्हाला दु:खातून मुक्ती देऊ शकते, असा प्रचार चीनच्या शासकीय यंत्रणेतील अधिकारी करत आहेत. चीनच्या दक्षिण पूर्व युगान प्रांतात रहाणार्या ख्रिस्ती नागरिकांना असा आदेश देण्यात येत आहे. येथे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती रहातात. या प्रांतातील १० लाख नागरिकांपैकी ११ टक्क्यांंपेक्षा अधिक लोक दारिद्य्ररेषेखाली रहातात.
अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ दैनिकाने युगान प्रांतातील सामाजिक माध्यमाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार गावातील लोकांनी स्वेच्छेने ख्रिस्ती धर्माशी संबंधित ६२४ चित्रे हटवली आहेत. आता ४५३ ठिकाणी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची छायाचित्रे लावली आहेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने गरिबी निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. पक्षाचे सदस्य गावोगावचा दौरा करून ‘पक्ष कशा प्रकारे शेतकर्यांच्या पाठीशी आहे’ ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ष २०२० पर्यंत गरिबी हटवण्याला चीनने पहिले प्राधान्य दिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात