कोट्टायम (केरळ) : येथील करिकुलंगरा रहिवासी कल्याण समितीने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना शालेय शिक्षण घेणार्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला एम्.जी. विद्यापिठाचे संपर्क आणि पत्रकारिता विभागाचे संचालक प्रा. माधवन् पिल्लई, पूर्व सैन्याधिकारी श्री. शैलेश आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. प्रणिता सुखटणकर उपस्थित होत्या.
१. प्रा. माधवन् पिल्लई यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समाजात वाढत असलेले तणावाचे वातावरण न्यून करण्यासंदर्भात काय करायला हवे, याविषयी मार्गदर्शन केले.
२. समितीच्या कु. प्रणिता सुखटणकर यांनी तणावाची कारणे आणि शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक या सर्व स्तरांवरून परीक्षा आणि अन्य वेळी मनावर येणार्या तणावावर मात कशी करावी, यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
३. मन कार्य कसे करते ?, व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचा आपल्या जीवनावर होणारा दुष्परिणाम आणि स्वयंसूचनांची परिणामकारकता यांविषयीही कु. प्रणिता यांनी उपस्थितांचे दिशादर्शन केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या आयोजकांनी अधिकाधिक मुलांना कार्यक्रमाचा लाभ होण्यासाठी परिश्रम घेतले.
२. सर्व विद्यार्थ्यांनी विषय नीट समजून घेतला आणि त्यांना येत असलेल्या अडचणी विचारून त्यांचे निरसनही करून घेतले.
३. येत्या काही दिवसांत मुलांसमवेत प्रौढांसाठीही अशाच स्वरूपाचे कार्यक्रम ठेवण्याविषयी आयोजकांनी शेवटी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात