Menu Close

केरळमध्ये बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याविषयी तरुणीची उच्च न्यायालयात याचिका

इसिसमध्ये भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप !

‘घरवापसी’ला विरोध करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविरोधात कधीच तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

थिरुवनंतपुरम् : केरळमधील एका २५ वर्षीय तरुणीने तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. तसेच धर्मांतर करून इसिसमध्ये भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असेही तिने म्हटले आहे. सिरीयामध्ये तिचा वापर आतंकवाद्यांना शारीरिक सुख देण्यासाठी करण्यात येणार होता. केरळमध्ये रहाणारी ही तरुणी मूळची गुजरातच्या जामनगर शहरातील आहे.

या याचिकेत या तरुणीने म्हटले आहे की, महंमद रियाज याच्याशी तिचा विवाह झाला होता. त्याने बनावट आधारकार्ड बनवले होते. विवाहानंतर त्याने या तरुणीचे आक्षेपार्ह स्थितीतील चित्रीकरण केलेे, तसेच विवस्त्रावस्थेतील छायाचित्रे काढली होती. याद्वारे तो तिला धमकावत होता. नंतर तिला सौदी अरबमध्ये नेण्यात आले. तिच्या मनात जिहादी विचार भरवण्यासाठी डॉ. झाकीर नाईक यांच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या. ‘रियाजची सिरियाला जाण्याची योजना होती आणि त्याने मला तसे सांगितले होते. तो मला इसिसच्या आतंकवाद्यांना विकणार होता’, असे तिने याचिकेत म्हटले आहे. या तरुणीने इंटरनेटच्या माध्यमातून तिच्या कुटुंबियांशी संपर्क केला आणि त्यांनी तिला सौदीमधून सोडवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *