भाजपचे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी या घटनेविषयी काही बोलतील का ?
धनबाद (झारखंड) : येथील धनसारमध्ये रहाणारे विनोद कुमार यांच्या पत्नी आणि मुले यांचे वर्ष २०१० मध्ये अपहरण करण्यात आले होते. त्यांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने विनोद कुमार नोकरीनिमित्त मध्यपूर्वेतील ओमान येथे गेले होते. ७ वर्षांनंतर त्यांना त्यांची पत्नी आणि मुले यांची माहिती मिळाल्यावर ते भारतात परत आले आणि न्यायालयात याचिका प्रविष्ट करून पत्नी आणि मुले त्यांना परत मिळण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे.
विनोद कुमार यांच्या पत्नी आणि मुले यांचे अपहरण महंमद उपाख्य सिद्धीकी याने केले होते आणि नंतर त्याने विनोद कुमार यांची पत्नी प्रिया हिच्याशी विवाह करून तिचे धर्मांतर केले. तसेच तिचे नाव शहाजहान ठेवले, तसेच मुलांचेही धर्मांतर करून सुजान आणि शामसा अशी नावे ठेवली.
विनोद कुमार यांचा विवाह २५ जून २००५ मध्ये झाला होता. विनोद कुमार यांनी न्यायालयाला सांगितले की, सिद्धीकी आणि त्यांच्या लोकांनी त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून १० लाख रुपयेही घेतले आहेत. विनोद कुमार यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सिद्धीकी याला अटक केली असली, तरी मुले आणि पत्नी त्याच्या घरीच आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात