धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित बैठकांमध्ये जळगावातील संतप्त हिंदूंचा ठाम निर्धार !
जळगाव : येथील ग्रामीण भागातील तरुणांनी ‘पद्मावती’ चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ, असा ठाम निर्धार व्यक्त केला. येथे १९ नोव्हेंबरला होणार्या धर्मजागृती सभेनिमित्त गावात घेण्यात येणार्या बैठकांमध्ये हिंदू ‘पद्मावती’ चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण आणि रोहिंग्या मुसलमांनाना देण्यात येणारा आश्रय यांविषयी संताप व्यक्त करत आहे. ‘धर्मजागृती सभेच्या माध्यमांतूनही याविषयी आवाज उठवावा’, अशीच मागणीही सर्वांकडून करण्यात येत आहे.
एरंडोल, भुसावळ, धरणगाव, पारोळा, यावल, चोपडा, सावदा, रावेर, वरणगाव, नशिराबाद, कानळदा, कासोदा यांसारख्या ८६ हून अधिक मोठ्या गावांत धर्मजागृती सभेचा प्रसार करण्यात आला आहे. काही गावांमध्ये धर्माचरणाचे महत्त्व समजल्यावर हिंदूंनी ‘हॅलो’ ऐवजी ‘जय श्रीराम’ म्हणणार असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात