यवतमाळ : येथील तिवसा या गावात १२ नोव्हेंबरला हिंदु धर्मजागृती सभा झाली. सभेला स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. युवकांमध्ये सभेमुळे उत्साह निर्माण झाला. श्री. मंगेश खांदेल यांनी सभेत मार्गदर्शन केले. सध्याच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक स्थितीविषयी सभेत सांगण्यात आले. पुरोगाम्यांच्या हत्यांप्रकरणी सनातनवरील खोट्या आणि निराधार आरोपांचा पाढाही वाचण्यात आला. धर्माचरणामुळे आपल्यात निर्माण होणारी सात्त्विकता आणि साधनेचे महत्त्व हा विषय सर्वांना आवडला.
सभेमुळे तरुणांना राष्ट्र-धर्म रक्षणासाठी प्रेरणा मिळाली ! – सरपंच, तिवसा
सभेनंतर तिवसा गावच्या सरपंच कु. राणी नारायण राठोड म्हणाल्या, ‘‘धर्मजागृती सभेमुळे आमच्या गावातील तरुणांना राष्ट्र-धर्म रक्षणासाठी प्रेरणा मिळाली.’’ माजी सरपंच श्री. श्रावण पवार यांनीही हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले. सभेला १५० धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात