Menu Close

अंबरनाथ येथे पोलीस ठाण्यात ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन !

अंबरनाथ : तणावमुक्तीसाठी आपण बाह्य उपचार करतो; पण त्याने तात्पुरता उपयोग होतो. आपल्यात असलेल्या दोषांमुळे तणाव निर्माण होतो; पण आपण परिस्थितीला दोष देतो. परिस्थिती कशीही असो, आपण स्थिर असणे महत्त्वाचे असते. आध्यत्मिक शक्ती आपल्यात निर्माण करण्यासाठी योग्य मार्गाने साधना केली, तर तणाव नष्ट होऊन आपले जीवन आनंदी होईल, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस यांनी केले. शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबरनाथ (पूर्व) येथे ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले होते. ११ पोलिसांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. गोपनीय विभागाचे श्री. नवनाथ लोकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिसांनी प्रवचन आवडल्याचे सांगून त्यांचे अध्यात्मातील स्वतःचे अनुभवही सांगितले.

क्षणचित्र 

अंबरनाथ येथील अन्य पोलिसांना या मार्गदर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप गोडबोले यांनी २१ नोव्हेंबरला मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *