क्ररकर्मा टिपू सुलतानच्या जयंती निमित्त शहरात प्रभात फेरी काढण्यात येऊ नये, यासाठी निवेदन दिल्याचे प्रकरण
- हे आहे सांगली पोलिसांचे ‘टिपूप्रेम !’
- क्रूरकर्मा टिपू सुलतान सारख्यांच्या समर्थनार्थ फेरी काढणार्यांना नव्हे, तर ती काढण्यास अनुमती न देण्याची सनदशीर मागणी करणार्या हिंदुत्वनिष्ठांना नोटीस बजावणे, हा पोलिसांचा उरफाटा न्याय ! अशाने पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडाला नाही, तरच नवल !
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : क्रूर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त ‘टिपू सुलतान युवा मंच इस्लामपूर’च्या वतीने १६ नोव्हेंबरला ‘प्रभात फेरी’ काढण्यात आली. टिपूने हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले, हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले, हिंदूंची ८ सहस्रांहून अधिक मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. टिपूचे उद्दातीकरण करणारी फेरी काढू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना निवेदन दिले; पण पोलिसांनी एका हिंदुत्वनिष्ठाला ‘फेरीत कायदा-सुव्यवस्थेचे पालन होणार नाही, असे कोणतेही कृत्य करू नये’, अशा आशयाची नोटीस बजावली.
नोटिशीमध्ये म्हटले आहे, ‘‘सांगली जिल्हाधिकार्यांनी ६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत बंदी आदेश लागू केलेला आहे, तरी आम्ही काही अटींवर फेरीसाठी अनुमती दिली आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी. बंदी आदेशाचे उल्लंघन होऊन कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास कार्यकर्त्यांना उत्तरदायी ठरवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, नोटीसचा पुरावा म्हणून न्यायालयात उपयोग केला जाईल.’’
पोलिसांनी दिलेली नोटीस स्वीकारतांना आणि नंतर पोलीस ठाण्यात जाऊन नोटिशीला उत्तर देतांना हिंदुत्वनिष्ठाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अधिवक्ताही पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात