Menu Close

मुसलमानाला तिकीट दिले नाही, तर मुसलमानांची मतेही मिळणार नाहीत ! – दक्षिण गुजरातमधील मुसलमानांची काँग्रेसला धमकी

निधर्मी लोकशाहीतील धर्मांधांची हुकूमशाही !

काँग्रेसने जे पेरले, तेच उगवले आहे !

 

सुरत (गुजरात) : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने दक्षिण गुजरातमधील एकाही मतदारसंघामध्ये मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. त्यामुळे मुसलमान कार्यकर्ते संतापले आहेत. तसेच नानगुरा कादरशाच्या नाल परिसरात ‘मुसलमानांना तिकीट नाही, तर मुसलमानांची मतेही नाहीत’, असे कापडी फलक (बॅनर) लावण्यात आले आहेत. पूर्व किंवा लिंबायत विधानसभा मतदारसंघातून मुसलमान उमेदवारास तिकीट देण्याची मागणी काँग्रेसकडे करण्यात आली होती. त्यासाठी प्रदेश काँग्रेसचे मंत्री फिरोज मलेक यांच्या नेतृत्वाखाली मक्काईपूल येथील काँग्रेसच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जर मुसलमान उमेदवारास तिकीट दिले गेले नाही, तर त्याविरोधात बॅनर लावले जातील, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली होती. अखेर उमेदवारी दिली गेली नाही, त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनर लावले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *