Menu Close

‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये !

‘सकल राजपूत समाज’ आणि हिंदुत्वनिष्ठांची मागणी

निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर : इतिहासाची विकृती करणार्‍या ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी येथील ‘सकल राजपूत’ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी सर्वश्री सकल राजपूत समाजाचे जय साळुंके, बजरंग दल जिल्हा संयोजक अंबादास गोरंटला, दीपक सुरवसे, अखिल भारतीय हिंदु महासभेचे सुधीर बहिरवडे, केसरी प्रतिष्ठानचे केदार पुजारी, आर्यवीर दलाचे सचिन करजगी, मोरया प्रतिष्ठानचे सुरज चौहान, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *