Menu Close

कल्याण येथे ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा प्रयत्न हिंदु धर्माभिमान्यांनी उधळला

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणारे हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत !

कल्याण : येथील खडकपाडा परिसरातील वायलेनगर या हिंदूबहुल भागात ख्रिस्त्यांचा प्रसाराचा आणि धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमान्यांनी उधळून लावला. (या धर्माभिमान्यांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदूंनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. वायलेनगर परिसरात पोद्दार शाळेजवळ ख्रिस्ती लोक काही साहित्य वाटत असल्याचे एका धर्माभिमान्याच्या लक्षात आले. त्यांनी तेथे चौकशी केल्यावर काही महिलांनी बायबलचे महत्त्व सांगितले.

२. हे धर्मपरिवर्तनाचे षड्यंत्र असल्याचे समजल्यावर धर्माभिमान्याने अन्य धर्माभिमान्यांनाही बोलावले. (अशी सतर्कता असली, तर धर्मावरील आघात न्यून होण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. ‘तेथे प्रदर्शन कक्ष लावण्याची अनुमती आहे का’, असे विचारताच त्यांनी अनुमती असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात पोलीस आल्यावर त्यांनी अनुमती दिली नसल्याचे सांगितले. (खोटारडे ख्रिस्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे पोलिसांनी त्यांचे साहित्य कह्यात घेतले.

४. तेथील महिला प्रचारकांनी धर्माभिमान्यांना सांगितले, ‘‘तुम्ही आमच्या देवाचे कार्य थांबवले. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल. सध्या सर्व जग सैतानाच्या नियंत्रणात आहे. त्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर आम्ही निवडलेल्या मार्गावर चला, अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे.’’ त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.

५. हिंदु धर्माभिमान्यांची क्षात्रवृत्ती पाहून ख्रिस्ती धर्मप्रचारक असलेल्या पुरुषांनी तेथून आधीच पळ काढला.

६. धर्माभिमानी या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी अधिवक्त्यांचा समुपदेश घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *