Menu Close

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ६ ओळींत घेणार्‍या शासनाविरुद्ध अधिवक्त्यांनी साहाय्य केल्यास महाराष्ट्रातही पालट घडेल ! – सुनील घनवट,हिंदु जनजागृती समिती

  • जळगाव जिल्हा बार कौन्सिलच्या सभागृहात अधिवक्त्यांना मार्गदर्शन

  • ११६ अधिवक्त्यांची उपस्थिती

जळगाव : राष्ट्र आणि धर्म संकटांत आहे. विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काहीही न करणारे भारतीय रोहिंग्यांना साहाय्य करत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ६ ओळींत घेणार्‍या शासनाविरुद्ध अधिवक्त्यांनी साहाय्य केल्यास महाराष्ट्रातही हा पालट घडवून आणू शकतो, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव जिल्हा बार कौन्सिलच्या सभागृहात अधिवक्त्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाला ११६ अधिवक्ते उपस्थित होते. बार कौन्सिलचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद बडगुजर यांनीही समितीला साहाय्य करणार असल्याचे सांगून आभार व्यक्त केले. प्रास्ताविक अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना साहाय्य करणे हे आपलेही दायित्व ! – श्री. प्रवीणचंद्र जंगले, ज्येष्ठ विधीज्ञ आणि लॉ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य

समितीचे कार्यकर्ते त्याग करून धर्मप्रचाराचे कार्य करत आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आपलेही हे दायित्व असून आपण त्यांना सर्वतोपरी साहाय्य करायला हवे. संत ज्ञानेश्‍वरांनी सांगितल्याप्रमाणे ‘जो जे वांछिल, तो तो लाहो’ या वचनाप्रमाणे आहे.

सनातन धर्मासाठी सर्वांनी संघटित व्हावे ! – श्री. सुधाकर चतुर्वेदी, हिंदुत्वनिष्ठ

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । धर्म ही कधी संपत नाही. दिव्य अशा सनातन धर्मासाठी सर्वांनी संघटित होणे आजची आवश्यकता आहे; कारण जग विनाशाच्या उंबरठ्यावर असणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *