Menu Close

‘बद्रीनाथ मुसलमानांचे असल्याने ते त्यांना परत द्या !’ – मौलाना अब्दुल लतीफ कासमी

मौलाना अब्दुल लतीफ कासमी यांची मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

  • इस्लामची स्थापना होण्याच्या अनेक शतकांपूर्वीपासून हे स्थान असतांना अशा प्रकारची हास्यास्पद मागणी करणार्‍या मौलानांना कारागृहातच डांबले पाहिजे !
  • देशातील लक्षावधी मंदिरांच्या मशिदी करण्यात आल्या आहेत, त्याच आता हिंदूंनी परत घेण्याची वेळ आली आहे !

देवबंद (उत्तरप्रदेश) : बद्रीनाथचे स्थान कायद्यानुसार मुसलमानांचे धार्मिक स्थान आहे. ते बदरूद्दीन शाह यांचे स्थान आहे. त्यामुळे त्याला मुसलमानांच्या कह्यात द्यायला हवे, अशी मागणी देवबंद येथील ‘मदरसा दारुल उलूम निश्‍वा’चे मौलाना अब्दुल लतीफ कासमी यांनी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे हे स्थान मुसलमानांना परत करण्याची आणि त्याचे नाव ‘बद्री शाह’ करण्याची मागणी केली आहे. मौलाना यांची संस्था सहारणपूर येथे काम करते. मौलाना या संस्थेचे उपसंचालक आहेत.

उत्तराखंडमधील ‘रक्षा अभियान दल’ या संघटनेने बद्रीनाथमध्ये रहाणार्‍या मुसलमानांना बद्रीनाथ सोडून जाण्याची धमकी दिली आहे. या मुसलमानांना गोमूत्र आणि गंगाजल पिणे अनिवार्य केले आहे. जर मुसलमान गोमूत्र आणि गंगाजल पिणार नसतील,  तर त्यांना येथे राहू दिले जाणार नाही, असे या संघटनेने म्हटले आहे. यावर मौलाना कासमी यांनी वरील विधान केले आहे. (अशी धमकी देण्याच्या पूर्वी मौलाना यांना हा इतिहास माहिती नव्हता का ? जर माहिती होता, तर त्यांनी तो यापूर्वी का सांगितला नाही ?, असे प्रश्‍न येथे निर्माण होतात. केवळ हिंदूंना विरोध करण्यासाठीच मौलान अशा प्रकारचा नवा ‘इतिहास’ सांगत आहेत ! – संपादक, निक सनातन प्रभात)

बद्रीनाथची स्थापना इस्लामच्यापूर्वी आदि शंकराचार्यांनी केली !

बद्रीनाथ येथील पुजार्‍यांनी मौलानाला वेडा म्हटले आहे. तसेच बद्रीनाथ येथील एका मौलानाने म्हटले आहे की, मौलाना कासमी यांना माहीत असायला हवे की, बद्रीनाथची स्थापना आदि शंकराचार्यांनी इस्लामच्या स्थापनेच्या आधी केली आहे.

मौलाना इस्लामला अपकीर्त करत आहेत ! – योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा यांनीही यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, अशी व्यक्ती खोटी माहिती पसरवून इस्लामला अपकीर्त करत आहे. बद्रीनाथची स्थापना इस्लामच्या आधी काही शतकांपूर्वी झाली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *