हिंदु भगिनींनो धर्मांधांच्या खोट्या प्रेमाला आेळखा !
‘लव्ह जिहाद’ म्हणजे ‘धर्मांध जिहाद्यांनी फसव्या प्रेमाच्या माध्यमातून हिंदू अन् खिस्ती समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध’, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. हिंदु स्त्रिया लव्ह जिहादला बळी पडू नयेत यासाठी संपूर्ण हिंदु समाजाने योग्य ती काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. हिंदूंनो, आता संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राला नामोहरम करूया आणि हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवा ! लव्ह जिहादचे भीषण वास्तव जाणून घ्या तसेच ते इतरांना ही सांगा ! : www.Hindujagruti.org
मुंबई : धर्मांतर करण्यासाठी पतीकडून आपल्यावर जबरदस्ती केली जात असून मारहाणही केली जात आहे, असा आरोप मुंबईतील मॉडेल रश्मी शहबाजकरने केला आहे.
रश्मी शहबाजकर हिंदू असून १३ वर्षापूर्वी तिचा विवाह आसिफ शहबाजकरशी झाला होता. ‘लग्ननंतरही तुला धर्मांतर करण्याची गरज राहणार नाही. तू हिंदूच राहशील,’ असे तिच्या पतीने तिला सांगितले होते. मात्र आता नवरा आणि सासरच्या लोकांकडून धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप या तिने केला आहे.
आपण धर्मांतर करण्यास नकार दिल्याने पती आसिफने दूसरे लग्न केले असून दुसऱ्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला. वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.