कोइम्बतूर (तमिळनाडू) : तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्नान् यांनी भारतात जन्माला येण्याची लाज वाटते, असे विधान करत देश सोडून जाण्याची चेतावणी नुकतीच दिली होती. जातीभेदामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावर येथील हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष) या हिंदुत्ववादी संघटनेने कर्नान् यांना देश सोडून जाण्याचा खर्च म्हणून १ लाख रुपयांचा प्रवासी धनादेश दिला आहे. धनादेशासमवेत या संघटनेचे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी एक पत्रही दिले असून त्यात म्हटले आहे की, त्यांनी कोणत्याही देशाची निवड करावी, त्यांना यासाठी अधिक पैसे लागत असल्यास तेही देण्याची सिद्धता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात