किती हिंदू रामजन्मभूमी पहाण्यासाठी अयोध्येला भेट देतात ?
नगर – पास्टर सुनिल गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मातरित ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्तांची जन्म आणि कर्म भूमीला भेट देण्यासाठी इस्रायलला ११ दिवसीय यात्रेसाठी गेले आहेत. तेथे जाणार्या ख्रिस्ती बांधवांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर कार्याध्यक्ष जॉय लोखंडे आणि बबलू जाधव यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप दिला.
या वेळी जॉय लोखंडे म्हणाले, ‘‘ख्रिस्तांचे जन्मस्थळ असलेल्या पवित्र भूमीत जाण्यासाठी पैशाविना नशीबही लागते. प्रभु येशू हे मानवजातीच्या कल्याणासाठी क्रूसवर गेले. मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर चालण्याची आज आवश्यकता आहे.’’ (येशू क्रूसावर गेल्याने आतापर्यंत मानवजातीचे काय भले झाले, तेही जॉय लोखंडे सांगतील का ? सत्याच्या मार्गावर चालण्याचा उपदेश लोखंडे यांनी प्रलोभने दाखवून गरीब हिंदूंचे धर्मातर करणार्या ख्रिस्ती मिशनरींना करावा ! – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात