Menu Close

रणरागिणी शाखेकडून ‘पद्मावती’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन !

जळगाव : येथे १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वी झालेल्या वाहनफेरीत रणरागिणी शाखेच्या वतीने ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या विरोधात प्रबोधन करण्यात आले. चित्रपटात राणी पद्मावती यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेला असल्याने त्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

कोणताही हिंदू इतिहासाचे विकृतीकरण असलेला ‘पद्मावती’ हा चित्रपट पहाणार नाही ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, रणरागिणी शाखा

‘पद्मावती’ या चित्रपटातून समाजात इतिहास, देश आणि संस्कृती यांविषयी चुकीचा संदेश जात आहे. सुसंस्कृत आणि वीरांगना असलेल्या राजपूत स्त्रियांनी स्वत: चेहर्‍याची सावलीसुद्धा कोणाला दाखवली नव्हती. अशा राजपूत राणीला सर्वांसमोर नाच करतांना दाखवणे हा इतिहास आहे का ? या चित्रपटाचा आम्ही सर्व निषेध करतो. आपले राजे आणि राण्या यांनी दिलेल्या बलीदानामुळे आपण स्वतंत्र आहोत, तसेच धर्माचरण करू शकत आहोत. पैशांसाठी इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटसृष्टीने हे लक्षात घ्यावे. इतिहासाच्या संरक्षणासाठी आपल्याला एकत्र यायचे आहे आणि आम्ही इतिहास विसरलो नाही, हे दाखवून द्यायचे आहे. कोणताही हिंदू इतिहासाचे विकृतीकरण असलेला ‘पद्मावती’ हा चित्रपट पहाणार नाही. हा संदेश आम्ही चित्रपटगृहांतही दिला असून तो सर्वत्र जायला हवा.

शीलरक्षणासाठी बलीदान देणार्‍या तेजस्वी राणीचा अवमान सहन करणार नाही ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

स्वत:च्या शीलरक्षणासाठी राणी पद्मावती यांनी बलीदान दिले आणि एक तेजस्वी इतिहास रचला. अशा तेजस्वी राणीचा अवमान आम्ही सहन करणार नाही. चित्रपटात दाखवलेला इतिहास खोटा असून आम्ही त्याचा धिक्कार करतो. रणरागिणी शाखा या चित्रपटावर बहिष्कार घालणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *